करोनाने आरोग्यव्यवस्थेसहीत अर्थव्यवस्थेचे, राजकीय व्यवस्थेचे व इतर मूलभूत समाज-व्यवस्थांचे नासलेपण उघड केलेले आहे!
लॉकडाउन केल्याने अशा साथीचा फक्त वेगच कमी होतो, विषाणू स्वतःहून मानवजगतातून बाहेर पडत नाही. लॉकडाउन करून साथीचा वेग सुरुवातीलाच कमी केल्यास जगभरातील जेवढे रुग्ण तो विषाणू एरवी काही महिन्यांतच बाधित करू शकला असता; तेच काम करावयास त्यास आता एक-दोन वर्षांचा कालावधी लागेल. हे नक्की की, या कालावधीत SARS-CoV-2 जगभरातील मोठ्या जनसंख्येस ज्ञात व खासकरून अ-ज्ञात कोविड-१९ रुग्णांच्या मार्फत बाधित करणार.......